कळंब (प्रतिनिधी)-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन 29 व 30 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. उदघाटन संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रारंभी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी व कै. सुमनबाई मोहेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

डॉ. अशोकराव मोहेकर यांनी उद्घाटन प्रसंगी विचार मांडताना विद्यार्थ्यांना आपल्या कणागुडांना वाव मिळावं व विद्यार्थी समाज, संस्कृती आणि आपल्या अंगी असलेल्या सुप्तगणांना सादर करण्याची संधी मिळावी. म्हणून अशा प्रकारचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करून विद्यार्थांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जातात. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी आपले अध्यक्षीय विचार मांडताना “आजचा तरुण हा देशाचा कणा आहे“ म्हणून या तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं नाव लौकिक करावं तसेच वेगवेगळ्या कलागुणांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन यशस्वी व्हावं असे अनमोल विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक, सिनेट सदस्य तथा डीसीसी बँकेचे संचालक डॉ. संजय कांबळे उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभागी होऊन सादरीकरण केले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्त वक्तृत्व, काव्यवाचन, वादविवाद, समूहगीत गायन, वैयक्तिक नृत्य आणि समूह नृत्य यांचे आयोजन केले. तसेच रांगोळी, पाककला, मेहंदी व चित्रकला स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले.

वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. संदिपान जगदाळे, दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांची उपस्थिती होती. डॉ. संदिपान जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना संस्कृती चारित्र्य व आपल्या कलागुणांवरती जास्तीत जास्त लक्ष देऊन आपले करिअर घडवू शकतात. तसेच ‌‘आजच्या तरुणांनी भारतीय संस्कृतीची जोपासना करावी' असे विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी संभाजीराजे यांच्या वर भारदार आवाजात पोवाडा गायला व सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील पवार, प्रमुख उपस्थितीत श्री. धोंडू देशमुख, डॉ. संजय कांबळे, उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान, डॉ. के. डी. जाधव, प्रा. अप्पासाहेब मिटकरी व प्रभारी प्राध्यापक डॉ. ईश्वर राठोड उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध कला प्रकारात पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देवून गौरव करण्यात आले. तसेच एन. एस. एस., एन. सी. सी. व क्रीडा विभागातील उत्कृष्ट विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी व राज्य व राष्ट्रीय पातळीवर पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देवून गौरव करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. दादाराव गुंडरे, डॉ. ज्ञानेश चिंते, डॉ. दत्ता साकोळे, डॉ. दीपक सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब बोंदर, डॉ. मीना साखळकर, प्रा. राजीव कारकर, प्रा. विलास आडसूळ, प्रा. विलास वमन, प्रा. जे. एच. काझी, प्रा. गोविंद काकडे, प्रा. नितीन अंकुशराव, डॉ. गणेश पाटील, डॉ. राघवेंद्र ताटीपामुल, डॉ. नागनाथ अदाटे, डॉ. हेमंत चांदोरे, प्रा. अनिल फाटक, डॉ. अर्चना मुखेडकर, डॉ. मीनाक्षी जाधव, डॉ. पल्लवी उंदरे, डॉ. नामानंद साठे, डॉ. के. डब्ल्यू. पावडे, डॉ. संदीप महाजन, प्रा. सुरेश वेदपाठक, प्रा. गणेश आडे, डॉ. बाबासाहेब सावंत, डॉ. जयवंत ढोले, डॉ. डी. एल. नवघरे, डॉ. श्रीकांत भोसले, डॉ. विश्वजित म्हस्के, प्रा. दीपक वाळके, प्रा. सरस्वती वायभासे, प्रा. अर्चना पाटील, प्रा. सुनिल भिसे, प्रा. बालाजी राऊत, प्रा. संदीप देवकाते, प्रा. प्रताप शिंदे, प्रा. किरण बारकुल, प्रा. महेश मडके, प्रा. अक्षय खंडाळे, प्रा. अभिजित बोबडे या सर्वांचे सहकार्य मिळाले. तसेच वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन सहकार्य केले. श्री. हनुमंत जाधव (अधीक्षक), श्री. अरविंद शिंदे (सहाय्यक ग्रंथपाल), श्री. विनोद खरात, श्री. संतोष मोरे, श्री. अरुण मुंडे, श्री. नेताजी देशमुख, श्री. अमोल सुरवसे, श्री. संदीप सूर्यवंशी, सूत्रसंचालन डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी तर आभार प्रभारी प्राध्यापक डॉ. ईश्वर राठोड यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top