तुळजापूर (प्रतिनिधी) -येथील मंगळवार पेठेतील भारतीय स्टेट बँक शाखा मंगळवार पेठ लाकुड वखार तसेच जवळच पोलिस स्टेशन असलेल्या मध्य भागातील वस्ती मधील घरात शाँर्टसर्कीट ने होवुन आग लागुन यात चार भावांचा घरालातील गँस सिलेंडरचे स्फोट झाल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर या स्फोटाने हादरुन गेले. सदरील घटना शुक्रवार दि. 31 जानेवारी रोजी रात्री 7 वाजता घडली. सुदैवाने आग न पसरल्याने वेळीच अग्नीशमन वाहनांनी आग विझवल्याने भारतीय स्टेट बँक व लाकडाचा वखारात आग न पोचल्याने मोठी दुर्घटना टळली.
या बाबतीत अधिक माहिती अशी कि, शहरातील लाकुड वखार, बँक, पोलिस स्टेशन भागाच्या मध्यवस्तीत चार सय्यद बंधुचे घरे आहेत. सांयकाळी शाँर्टसर्कीट होवुन घराला आग लागली. यात सहा पैकी पाच गँस सिलेंडर स्फोट होवुन घरातील रोख रक्कम, सोने चांदी, घरगुती सामान, कपडे लत्ते जळुन एकुण 59 लाख 32 हजार 500 रुपयाचे नुकसान झाले. त्याचा पंचनामा मंडल अधिकारी अमर गांधले व शहर तलाठी अशोक भातभांगे यांनी केला. घटनास्थळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील यांनी भेट देवुन सय्यद परिवाराला धीर दिला.
यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. रहीम करीम सय्यद 11 लाख 50 हजार, सलीम करीम सय्यद एकुण 27 लाख, कलीम करीम सय्यद 3 लाख 50 हजार, अलीम करीम सय्यद 14 लाख 15 हजार, बाबु करीम शेख 22 हजार, शहनाज बासुमिय्या नदाफ 32 हजार 500 असे एकुन 59 लाख 32 हजार 500 रुपये नुकसान झाले.