नळदुर्ग (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींनी आणि लाडक्या भावांनी कधी नव्हे ते महाराष्ट्रात 237 आमदार निवडुण देवून महायुतीच सरकार दिले आहे. त्यामुळे सर्वासामान्य नागरीकांना मोफत आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, या साठीच माझा प्रयत्न असून धाराशिव जिल्हयातील इतर ऑक्सीजन पुरवठा रुग्णालय, व्यवस्थापन माध्यमिक धर्मशाळा, आदयावत आत्याधुनिक औषधी भांडार, तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय, आणि नळदुर्गचे उपजिल्हा रुग्णालय या सर्वांच लोकार्पण आणि भुमीपूजन झाल्याचे जाहीर करीत आहे. असे प्रतिपादन धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळयाच्या समारंभात केले. 

या वेळी या कार्यक्रमासाठी माजी खासदार रविंद्र गायकवाड, आमदार प्रविण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, अनिल खोचरे, सुधीर पाटील, नितीन काळे, जिल्हा शल्यचिकीत्सक धनंजय चाकुरकर, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, धाराशिवचे पप्पू मुंढे, शफी शेख, भाजपाचे सुशांत भुमकर, आदीसह मान्यवर उपस्थीत होते. यावेळी पुढे बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, धाराशिव जिल्हयामध्ये नागरीकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाकडून मोठया प्रमाणात काम केले जात आहे, जनमसान्यांना, महीलांना व पुरुषांना आणि जेष्ठांना अरोग्याच्या सुविधा देता याव्यात म्हणून नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले जन अरोग्य सेवेचा शुभारंभ केला आहे, आणि या सेवेमधून जास्तीत जास्त गोर गरीबांना पाच लाख रुपये पर्यंत उपचार आणि औषधे कसे दिले जातील यासाठी जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे असे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना म्हटले की, नळदुर्गच्या नागरीकांनी नळदुर्गला एस टी बस डेपोची मागणी केली आहे. त्यामुळे नळदुर्गकरांनी जागा दयावी आणि बस डेपो आजच मंजूर केला. पण त्यासाठी जागा उपलब्ध करुन दयावी असे ही ते म्हणाले.

नळदुर्गचे उपजिल्हा रुग्णालय लोकार्पण सोहळयाच्या समारंभाला तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंग पाटील हे उपस्थीत नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमात तुळजापूरचे आमदार नसल्यामुळे उपस्थीतांतून उलटसुलट चर्चा होत्या. 

या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी, माजी उपनगराध्यक्ष इमाम शेख, मनसेचे शहर चिटणीस प्रमोद कुलकर्णी, शिवसेनेचे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संतोष पूदाले, माजी नगरसेवक बसवराज धरणे, मनसेचे जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, सरदारसिंग ठाकुर, दत्तात्रेय कोरे, सुधीर हजारे, संजय विठठल जाधव, काँग्रेस कमेटीच्या सुभद्राताई मुळे, कल्पना गायकवाड, विनायक पुदाले, पप्पू पाटील, शिवाजी सुरवसे, गौस कुरेशी, मनोज मिश्रा उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचाल र्स्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख रमाकांत जोशी यांनी केले.

 
Top