धाराशिव (प्रतिनिधी)-हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवराज्याभिषेक सोहळा समिती आणि धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने व धाराशिव शहर वाहतूक शाखेच्या सहकार्याने आयोजित स्केटिंग रॅलीस खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यशस्वी केली.
धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकात राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून रॅलीस पोलीस उपनिरीक्षक पंडित आबा मुंडे यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, नायब तहसीलदार सचिन पाटील, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष गौरव बागल, धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष ॲड जयंत जगदाळे, सचिव प्रविण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, संचालक रवींद्र जाधव, किरण शानमे, अभियंता चंद्रकांत जाधव, कोच कैलास लांडगे, यशोदीप कदम आदींसह पालक आणि खेळाडूंची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
राजमाता जिजाऊ चौक बार्शी नाका, मध्यवर्ती इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावर घेण्यात आलेल्या स्केटिंग रॅलीत सहभागी खेळाडू यांच्या छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी जयघोषाने रॅली मार्गावरील परिसर दणाणले व रॅली नागरिकांना आकर्षण करणारे ठरली.
पोलीस उपनिरीक्षक पंडित आबा मुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, नायब तहसीलदार सचिन पाटील, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष गौरव बागल, धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष ॲड जयंत जगदाळे, सचिव प्रविण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, संचालक रवींद्र जाधव, किरण शानमे यांच्या हस्ते रॅलीत सहभागी खेळाडूंचा मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.