तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी सरपंच दिदी काळे, सचिव ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे, सहसचिव ग्राम कृषी अधिकारी आर.व्ही.शिंदे, पदसिद्ध सदस्य उपसरपंच श्रीमंत फंड, सदस्य आशा कांबळे, राजकन्या काळे, अजित कदम, बापू नाईकवाडी, आशा गोरे, तानाजी मदने, प्रज्ञा फंड, सतिष कदम, काकासाहेब मगर, ज्योती नाईकवाडी, अर्चना पालवे, राणी शिराळा, तलाठी प्रशांत देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.