तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील संपदा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत हळदकुंकु कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी संपदा प्रतिष्ठान अध्यक्षा मीराताई श्रीकृष्ण सुर्यवंशी यांच्या हस्ते महिलांना घड्याळ भेट देण्यात आले.
प्रांरभ ग्रथालय महर्षी व ग सुर्यवंशी रा काँ तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांच्या हस्ते श्रीतुळजाभवानी प्रतिमा पुजन करुन या कार्यक्रमास आरंभ झाला. मीराताई श्रीकृष्ण सुर्यवंशी यांच्या वतीने पर्ण-कुटी शुक्रवार पेठ परिसरात महिलांना आकर्षक घड्याळ भेट देण्यात आली. यावेळी रेशमा पवार, एश्वर्या कदम, शुभांगी पवार, सोनाली पवार,जयश्री कदम यांच्यासह कुमारी संपादा सुर्यवंशी, श्रावणी कदम, गाजल काचोळेसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.