तुळजापूर (प्रतिनिधी) - शहरात म्हशीं पळविण्याच्या घेण्यात आलेल्या शर्यतीत विशाल गोडसे ची म्हैस प्रथम आली. तर रेडकु पळविण्याच्या स्पर्धत प्रमोद गवळीचे रेडकु प्रथम आले. विजेत्यास पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या हस्ते रोख सात हजार शंभर रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.
पुजारी नगर सोसायटी परिसरात या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत एकूण 15 रेडकू तर 19 म्हशींच्या पशुपालकानी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोमनाथ मस्के,वैभव मस्के,संकेत मस्के, प्रमोद गवळी,अक्षय जमदाडे,शार्दूल शेरकर,सोमनाथ पुजारी,सागर धनके, अलोक शिंदे,मंगल सय्यद,अक्षय दिवटे, प्रसाद गवळी,ओंकार फिस्के आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रमथ विजेता म्हेस पशुपालक विशाल गोडसे यांना रोख सात हजार शंभर रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेता पशुपालक आकाश कोळी यांना पाच हजार शंभर रुपये, तृतीय क्रमांक विजेता पशुपालक सज्जन घाटशिळे यांना तीन हजार शंभर रुपये व सन्मानचिन्ह, चौथा क्रमांक विजेता पशुपालक योगेश पाटील यांना दोन हजार शंभर रुपये व सन्मानचिन्ह पाचवा क्रमांक विजेता पशुपालक संकेत मस्के यांना अकराशे रुपये व सन्मानचिन्ह आयोजकांतर्फे देण्यात आले.
तर वासरांच्या (रेडकू) शर्यतीत प्रथम पशुपालक विजेता प्रमोद गवळी, द्वितीय रुद्र पारधे, तृतीय विशाल मस्के, चौथा महेश साखरे तर पाचवा अजय सुरवसे यांचे रेडकू विजेते झाले आहेत. यांना ही रोख स्वरूपात रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले.