नळदुर्ग (प्रतिनिधी)- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नळदुर्ग येथील हजरता सैय्यदा खैरून्नीसा बेगम उर्फ नानिमाँ सरकार यांच्या 50 व्या उर्स निमित्त 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उरूसनिमित्त नानीमाँ सरकार यांच्या दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषनाई करण्यात आली आहे.
दर्गाह परिसरात विविध व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत. नानीमॉ सरकार यांच्या उर्स ची सुरुवात 5 फेब्रुवारी रोजी 4 वाजता संदल मिरवणुकीने होणार आहे. संदल मिरवणुकीस रिझवान काझी यांच्या राहत्या घरापासून ऐतिहासिक किल्ल्यातील नानीमाँ सरकार राहत असलेल्या ठिकाणा पर्यंत जाऊन परत तेथून किल्ला गेट येथे आल्यानंतर मुख्य संदल मिरवणुकीस सुरुवात होणार आहे . हि मिरवणूक पोलीस स्टेशन समोरुन मिसरी गंज चौक, क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, मुख्य बाजारपेठ, बस स्टॅन्ड, हुसेनी चौक मार्गाने नानीमाँ दर्गाह पर्यंत वाजत गाजत आल्यानंतर नानीमॉ सरकारच्या दर्ग्यात संदल पोहोचल्यानंतर कुराण पठण व विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर संदल चढविण्याचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी चिराग रोषणाई चा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता मुफ्ती रिजवान पाशा कादरी हैद्राबाद व अफजल पाशा कादरी सज्जाद नशीन उदगीर यांचा धार्मिक प्रवचन व नात शरीफ चा कार्यक्रम हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जागीरदार, आलेम मोहम्मद रजा,हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार,हाफेज फारुक अहेमद,हाफेज मुसा जमादार,हाफेज कैसर पाशा जहागीरदार,हाफेज शफीक रजा,हाफेज साजीद रजा,हाफेज अजीम इनामदार, हाफेज फुरखान नक्शबंदी,हाफेज मुजफ्फर शेख, हाफेज इस्माईल काजी,हाफेज मुदस्सर कुरेशी, हाफेज शोएब रजा,हाफेज जाफर सय्यद,हाफेज अब्दुल्ला काझी च्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.उर्सच्या शेवटच्या दिवशी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता जिरायतचा कार्यक्रम होऊन तबरुक (महाप्रसादाचा) कार्यक्रम झाल्यानंतर उर्स ची सांगता होणार आहे. उर्स निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रिझावानउल्ला काझी, इमरानउल्ला काझी, खाजाभाई मुच्छाले, शहानवाज मुच्छाले यांनी केले आहे.