भूम (प्रतिनिधी)- मुलीच्या छेडछाड प्रकरणी तालुक्यातील बावी येथे जाब विचारला असता मुलीच्या कुटुंबावर जीव घेणा हल्ल्याची घटना दि. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 2. 30 वाजण्याच्या दरम्यान घडली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे बावी गावातील गावकऱ्यांनी दि. 25 फेब्रुवारी रोजी गाव बंद ठेवले आहे. आरोपीना कठोर शिक्षाची मागणी केली आहे. दरम्यान सदर आरोपींना न्यायालयात हजर केली असता तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बावी येथील फिर्यादी भागवत राजेंद्र उभे हे बीवी येथे राहतात. त्यांच्या मुलीस आरोपी बाबा विजय काळे हा सातत्याने घरासमोर जाताना गाडीचा हॉर्न वाजवून मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. यापूर्वी अनेकदा त्याने असेच छेडछाडीचे प्रकार केलेले असल्याने याबाबत गावाचे सरपंच यांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवले. तरीही आरोपी बाबा काळे हा घरासमोरून येता जाता छेडछाड करत होता. याबाबत फिर्यादी भागवत राजेंद्र उभे यांनी आरोपीस याबाबत जाब विचारला व अनेकदा समज ही दिली. तरी ही हे प्रकरण सरपंच यांनी मिटवले. आरोपी घराकडे निघून गेले. त्यानंतर आपसात संगणमत करून मुख्य आरोपी बाबा विजय काळे, विजय राजाराम काळे, राजाराम काळे, आरती विजय काळे,मोनिका बाबा काळे सर्व राहणार बावी यांनी उभे कुटुंब अंगणात बसलेले असताना हातात लोखंडी रॉडने येऊन आमच्या मुलाने हॉर्न वाजवल्याने तुम्हाला काय त्रास होतो. असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बाबा काळे व विजय काळे यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत मोठा भाऊ अशोक यास त्यांच्याकडील लोखंडी रॉडने मारले. माझी आई इंदुबाई उभे व पत्नी चंदा उभे यांना विजय काळे व मोनिका बाबा काळे लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच माझा मुलगा यश भांडणे सोडवण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याला लाथाबुक्यानी मारहाण केली. शेजारील नागरिकांनी भांडणे सोडवल्यानंतर जखमी अशोक राजेंद्र उभे व त्यांची आई इंदुबाई उभे यांना प्रथमोपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी धाराशिव येथे पाठवले आहे. 

 
Top