तुळजापूर (प्रतिनिधी)- यंदा उन्हाळा फेब्रुवारी मध्येच जाणवु लागल्यामुळे भाविकांना ऊन पासुन संरक्षण मिळावे म्हणून मंदीर संस्थानतर्फ मंडप उभारणीस आरंभ झाला आहे.
गुढी पाडव्या नंतर मंदीर प्रशासन मंडप टाकत होते. माञ तापमान 35 अंशावर आता गेल्याने उष्णता वाढत आहे. उन्हाळा पार्श्वभूमीवर भाविकांना ऊन लागु नये म्हणून मंडप व पाय पोळु नये जमिनीवर मँट अंथरले जाये. मंदीरात प्रदक्षणा मार्ग, निंबाळकर दरवाजा ते राजमाता माँ जिजाऊ महाव्दार तसेच दोन्ही मंदीर महाव्दार व मुख्य प्रशासकिय कार्यालय समोर तसेच भवानी रोडवर समोर मंडप उभारण्यात येत आहे. यासाठी कायम स्वरुपी लोखंडी मंडप साचा बनवला आहे.मंडप उभारणी कामामुळे भाविकांना ऊनापासुन संरक्षण मिळत असल्याने भाविकांना दिलासा मिळणार आहे.