भूम  (प्रतिनिधी)- भुम, परंडा मतदारसंघातील भुम मधील मातब्रर राजकारणी अंबेवाले गाढवे व खजुरवाले राजे थोरात राजकारणात एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे कधी एकत्र पण येतील, कधी विरोधी बाकावर पण बसतील असे दोन्ही नेते आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस हे परंडा येथे भाजपचे नेते सुजित सिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त जात असताना त्यानिमित्ताने भूम येथील त्यांचे मित्र संजय गाढवे व विजयसिंह थोरात यांच्या भेटी करता आले असता धस यांच्या भेटीमुळे हे दोघे एकत्र दिसून आल्याने आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधान आले आहे. 

इतर वेळी सातत्याने एकमेकांना विरोध करणारे विजयसिंह थोरात आणि संजय गाढवे हे आमदार सुरेश धस यांच्या भेटीमुळे एकत्र आले. कारण होते विजयसिंह थोरात यांच्या शेतात लावलेली खजूर लागवड पाहण्याचे तर संजय गाढवे यांचे शेतात लावलेले आंबा लागवड बद्दल माहिती घेण्याचे  यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे व दोन्ही नेत्यांमध्ये दोन्ही पिका विषयी चर्चा झाली. धस यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेला एकमेकाविरुद्ध असणारे नेते व कार्यकर्ते एकत्र छायाचित्र सुद्धा दिसू लागले.

 
Top