तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे येणारे ड्रग्ज पोलिसांनी पकडताच तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज मुक्ती साठी सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी शहरवासियांची बैठक होवुन यात तिर्थक्षेञी ड्रग्ज येण्यास रोखण्यास अपयशी ठरलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पालकमंञी प्रताप सरनाईक यांना गुरुवार दि. 20 फेबु्रवारी रोजी ते श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आले निवेदन देण्याचे ठरले. या बाबतीत प्रशासनाने पुढील पावले न उचलल्यास रस्ता रोको, तिर्थक्षेञ बंद करण्याचे शहरवासियांचा झालेल्या बैठकीत ठरले.
या बैठकीत आपले विचार मांडताना शहरवासीय म्हणाले कि, तिर्थक्षेञी शांतता, सुरक्षितता महत्त्वाची आहे. राञी अपराञी भाविक येतात. त्यांच्या सोबत महिला असतात. ड्रज आहेरी मंडळीमुळे महिला भाविक यांची सुरक्षितता, तिर्थक्षेञाची शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. दीड ते दोन वर्षापासुन ड्रग्ज येथे येत आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे ड्रग्जचे मोठे रँकेट सेंटर बनले असल्याचे यावेळी काहींनी सांगितले.
या बाबतीत विविध दैनिकात बातम्या प्रसिध्द होवुन ही दखल घेतली नाही. या प्रकरणी एकही कारवाई दीड ते दोन वर्षात झाली नाही. ड्रग्ज आहेरी हजारो तरुन गेले आहेत. ड्रग्ज घटनेने तिर्थक्षेञ तुळजापूरची राज्यात नव्हे तर देशात बदनामी झाली आहे. तिर्थक्षेञ ड्रग्ज अवैध धंदे मुक्त होणे गरजेचे आहे. यासाठी आताच पावले उचलणे गरजेचे आहे. या विचार पार्श्वभूमीवर प्रथम पालकमंञी यांना निवेदन द्यायचा निर्णय घेऊन नंतर टप्पा टप्याने आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी महंत मावजीनाथ महाराज, अमरराजे कदम, उत्तम अमृतराव, विपीन शिंदे,पंकज शहाणे, रुषी मगर, नरेश अमृतराव, दत्ता हुंडेकरी, अमर चोपदार, अमोल जाधव सह सर्व पक्षाचे पदाधिकारी व्यापारी, शहरवासिय मोठ्या संखेने उपस्थित होते.