तुळजापूर  (प्रतिनिधी)- तालुक्यातील  मौजे वडगाव लाख येथील गट नं. 310, 312, 313 मधील शेतरस्ता तहसीलदार यांच्या आदेशानुसार दहा दिवसात खुला करून न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इषारा महेश उर्फ शिवराज राजेंद्र मेटे यांनी मंडळ अधिकारी विभाग सलगरा (दि.) ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांना दिला आहे.

वडगाव लाख येथील महेश उर्फ शिवराज राजेंद्र मेटे ग्रा.पं. सदस्य वडगाव लाख.यांनी निवेदनात म्हटले आहे कि, मौजे वडगाव लाख येथील गट क्र. 310, 312.313 मधील नकाशावर असणारा व नायब तहसीलदार तुळजापूर यांनी आदेशित केलेला शेतरस्ता सात महिन्या पासुन खुला केला नाही. त्यामुळे पुढील शेतकऱ्यांना  शेती कसणे कठीण होवुन बसले आहे. बरे तहसिलदार यांचा आदेशानुसार पुढील 10 दिवसात खुला करून देण्यात यावा. अन्यथा आमरण उपोषण करणार आहे. याची नोंद घ्यावी असे  महेश उर्फ शिवराज राजेंद्र मेटे ग्रा.पं. सदस्य वडगाव लाख.यांनी निवेदनात म्हटले आहे.


 
Top