धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 395 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  प्राचार्य नंदकुमार नन्नवरे व  इतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर शिवजयंतीनिमित्त शासकीय पत्रान्वये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस  देऊन सत्कारीत करण्यात आले. यावेळी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी छत्रपती शिवरायांच्य कार्याचे महात्म्य आपल्या भाषणामध्ये विशद केले . त्यानंतर मुलांना बुंदीलाडू वाटप करून कार्यक्रमाचे सांगता झाली.

त्यानंतर 'जय शिवाजी जय भारत पदयात्रा ' या शासकीय पत्रान्वये इयत्ता आठवीचे विद्यार्थी व विविध वेशभूषा परिधान केलेल्या मुलांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी  प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक  यशवंत इंगळे, सुनील कोरडे, श्रीमती बी.बी. गुंड, राजेंद जाधव, निखिलकुमार गोरे, धनंजय देशमुख, मोहनराव शिंदे,  विनोद आंबेवाडीकर व कलाध्यापक शेषनाथ वाघ, शिवाजी भोसले व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top