तुळजापूर (प्रतिनिधी) -  तिर्थ तुळजापूर शहरालगत धाराशिव- छत्रपती संभाजीनगर हायवे लगत असणारे स.न. 138/1 या ठिकाणी यात्रा मैदानासाठी दि. 28/02/1998 या तारखेला 2 हेक्टर 63 आर इतकी जमीन भुसंपादन झालेली आहे. त्या भुसंपादीत शासनाच्या जागेवर संगणमताने बोगस लेआऊट क्षेत्रात आलेले बोगस लेआऊट रदद करुन कायदेशीर काग्रवाही करुन त्या ठिकाणी भाविकासाठी यात्रा मैदान करण्याची मागणी पुजारी बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे. 

तुळजापूर येथील सदरील  ठिकाणी स.न. 138/1 याक्षेत्रावर तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकभक्तांसाठी शासनाने 28/08/1998 या तारखेला हे भुसंपादन केलेले असताना या क्षेत्रावर तुळजापूर नगरपरिषदेच्या नगरसेवकांने (मा. उपाध्यक्ष) यांनी नगर सेवक पदाचा गैरवापर करुन बेकायदेशीर संगणमताने लेआऊट तयार करुन ती जमीन विक्री करुन गिळंकृत केलेली आहे. ज्या उददेशाने हे भुसंपादन झालेले आहे. तो शासनाचा उददेश सफल होताना दिसून येत नाही. 

सदरील जागा ही भाविक भक्तांना या ठिकाणी सोईचे होईल व जवळच 500 मी अंतरावर देवीजीचे मंदिर आहे. तरी ज्या यात्रा मैदानासाठी नगरपरिषद तुळजापूर यांनी जागा आरक्षण ठेवली होती. त्या यात्रा मैदानासाठी शासनाने ती जमीन भुसंपादन करुन दिलेली आहे. व त्या ठिकाणी यात्रा मैदान निर्माण करुन भाविक भक्तांची सोय होणार आहे. तुळजापूर शहरातील पुजारी बांधवाच्या जिव्हाळ्याचा प्रश्नाकडे शासनाने लक्ष दयावे व त्या ठिकाणी यात्रा मैदान होणे हे अत्वयंत गरजेचे व जरुरीचे आहे. तुळजापूर शहरात वरचेवर भाविक भक्तांची होणाऱ्या संख्येत वाढ लक्षात घेता व पुढे भविष्यात ही वाढ अनेक पटीने होत राहणार आहे. तरी याचा विचार करुन शासनाने यात्रा मैदान निर्माण करुन भाविक भक्तांची होणारी होळसांड दूर करुन त्या ठिकाणी यात्रा मैदान निर्माण करुन तुळजापूर शहरातील पुजारी बांधवाना व भाविक तिर्थक्षेञ तुळजापूर  हे रेल्वे नकाशावर आलेले आहे. रेल्वेमुळे भाविकांच्या संख्येत प्रचंड  वाढ होणार असल्याने वाहतुक समस्या सोडण्यासाठी येथे वाहनतळ होणे गरजेचे आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

 
Top