धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 8 फेब्रुवारी 2025 शनिवार जया एकादशी, रोजी“धाराशिव जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ धाराशिव“ची कळंब शहराची नवीन कार्यकारणी बैठक घेऊन निवड करण्यात आली. 

या बैठकीस प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,जिल्हा युवक अध्यक्ष शशिकांत बेगमपुरे यांची होती. याबैठकिस जिल्हाध्यक्ष रवि कोरे यांनी सांगितले की, पदाधिकारी यांनी संघटन वाढीकडे लक्ष दिले पाहिजे.समाजातील प्रत्येक घरात पोहचा त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या तरच आपले संघटन होईल. यासाठी आज निवड केलेल्या पदाधिकारी यांनी हि जबाबदारी घ्यावी असे आवाहन रवि कोरे यांनी केले.  या बैठकीस कळंब तालुक्यातील कळंब तालुकाध्यक्ष सचिन देशमाने, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक त्र्यंबक कचरे, तालुका उपाध्यक्ष, दत्ता शेवडे, भागवत किरवे, तालुका सचिव बसलिंग शेवते, विजय देशमाने, माजी शहराध्यक्ष अशोक चिंचकर, दत्ता हिंगे साहेब, नारायण क्षिरसागर, गोकुळ बरकसे,सोमनाथ देशमाने,वैजिनाथ देशमाने दादा चिंचकर,नवनाथ फल्ले,संतोष देशमाने,यांची प्रमुख उपस्थिती होती,जिल्हाध्यक्ष रवी कोरे साहेब यांच्या सूचनेनुसार,कळंब शहर आणि तालुक्यात पाच ज्येष्ठ सन्माननीय आदरणीय मार्गदर्शक यांची नियुक्ती केली आहे अर्जुन चिंचकर,लक्षण आबा फल्ले,बाळकृष्ण गुरसाळे,सोमनाथ देशमाने,शहाजी कानडे, इत्यादी पाच जणांची ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे.आणि कळंब शहरासाठी नवीन नऊ जणांची कार्यकारणीची घोषणा जिल्ह्याकडून करण्यात आली आहे कळंब शहराध्यक्ष गणेश शेवते,कळंब शहरउपाध्यक्ष सोमनाथ क्षीरसागर,कळंब शहर उपाध्यक्षपदी संदीप शेवते, कळंब शहर कार्याध्यक्षपदी किरण फल्ले,कळंब शहर सचिव  रोहित किरवे, कळंब शहर संघटक बालाजी वांकर,कळंब शहर कोषाध्यक्ष ओंकार कलशेट्टी,कळंब शहर सहसचिव बबलू दळवे,कळंब शहर सहसंघटक विजय देशमाने यांना निवडीचे पत्र हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top