धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील वडगाव (सि) येथे प्रतिवर्षा प्रमाणे या ही वर्षी महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक व मनोरंनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविक, भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये रविवार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8 ते 11 दरम्यान प्रा. सुनिताताई मोहिते, प्रा. उमेश मोहिते, अभिमन्यु मोहिते गुरूजी यांचा भक्तीसंध्या हा कार्यक्रम होईल. सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 8 भक्तीनाद भजन संध्या (उजनी, ता. औसा, जि. लातूर) कार्यक्रम होईल. रात्री 9 ते 11 ह.भ.प. शिवानंद महाराज पैठणकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम रात्री 12 ते 2 श्री. सिद्धेश्वर भजनी मंडळ, वडगांव (सिद्धेश्वर) यांचे जागर कार्यक्रम होईल. मंगळवार, 25 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 11 युवकवीर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम होईल तर रात्री 12 ते 2 हरिजागर होईल.
बुधवार, 26 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्री दिवशी सकाळी 6 ते 7 श्री. सिद्धेश्वरांच्या पालखीचे गावात सभामंडपामध्ये आगमन, सकाळी 8 ते 10 शिवलिलामृत (शिवरात्री महात्म्य) ग्रंथ वाचन, सकाळी 11 ते 12 वडगांव रत्न पुरस्कार सत्कार समारंभ कार्यक्रम (स्थळ : हनुमान मंदिर), दुपारी 1 ते 5 भारूडाचा भरगच्च कार्यक्रम, सायंकाळी 7 ते 10 श्री. सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीची गावात सवाद्य मिरवणूक होऊन सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्थान होईल. रात्री 11 श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये 'श्री' च्या पालखीची प्रदक्षिणा व नंतर शोभेची दारू व नंतर श्री. सिद्धेश्वर मंदिरामध्ये हरिजागर होईल.
गुरूवार, 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 6 श्री. सिद्धेश्वर मंदिरासमोरील मैदानात कुस्त्यांचे जंगी कार्यक्रम होतील. रात्री 7 ते 9 ह.भ.प. वैभव महाराज कानेगांवकर यांची किर्तन सेवा अमावस्यानिमित्त श्री. सिद्धेश्वर मंदिरामध्ये होईल. तसेच याच दिवशी रात्री 9 ते 12 या दरम्यान गावातील जि. प. प्रशालेच्या प्रांगणात लावण्यखणी हा सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वरील सर्व कार्यक्रम हे गावात महाशिवरात्रीनिमित्त उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात होणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त निमित्त श्री. सिध्देश्वर मंदिर तसेच गावात आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. वडगाव (सि) व परिसरातील भाविक, भक्तांनी वरिल सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वडगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.