तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात चोरीचे सञ सुरुच असुन शनिवारी राञी शहरातील तुळजाई नगर व शिंदे प्लाँटींग या भागात चोरट्यांनी धुमाकाळ घातला.

या बाबतीत अधिक माहीती अशी कि, शहरातील तुळजाई नगर व शिंदे प्लाँटींग भागात सुशिक्षित लोकांचे बंगले आहेत. येथे शनिवारी राञी तीन ते चार घरात प्रवेश करुन या चोरट्यांनी ऐवज चोरी केल्याचे समजते. चोरी करण्यापुर्वी चोरट्यानी सीसीटीव्ही कँमरे हालवण्याचा प्रयत्न केला. तर चव्हाण यांच्या घरासमोर लावलेल्या चार चाकी वाहनाचे काचा फोडुन टायर चक्क चोरट्यांनी काढुन घेवुन गेल्याची घटना घडली. सदरील चोरीच्या घटनेचे व्हीडिओ व चर्चा  दिवसभर सोशल मिडीयावर व्हायरल होत होती. या चोरी घटनेत रोख रक्कम व सोने, चांदी दागिने किती चोरीला याची नेमकी माहीती मिळु शकली नाही. या चोऱ्यांच्या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरल आहे. नुतन पोलिस निरक्षक हे नुकतेच रुजु झाले असुन त्यांचे स्वागत चोरट्यंनी चोऱ्या करुन केल्याची शहरवासियांमधुन प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.


 
Top