तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील कामठा, वरवटी शिवारात दुध घेवून परत येणाऱ्या एका शेतकऱ्याला शनिवार दि. 22 फेब्रुवारी रोजी सांयकाळी सात वाजता वाघ दिसला. त्याने ती माहीती वनविभागाला दिली. वनविभागाचा वीस जणांचा पथकाने शनिवार राञभर वाघाचा शोध घेतला पण सापडला नाही. माञ सकाळी वाघ आलेला व परत गेलेले वाघ्याचे ठसे दिसले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात
येडशी येथील रामलिंग अभयारण्यामध्ये आढळलेला वाघ तुळजापूर तालुक्यातील कामठा येथे शनिवारी सायंकाळी सात वाजता एका शेतकऱ्यास दिसला या बाबतीत वनविभाग पथक तात्काळ दाखल झाले. राञभर शोध घेतला माञ दिसला नाही. सकाळी मात्र येडशी येथुन काञी मार्ग खालच्या बाजूने आला. नंतर तो जमदाडे यांच्या बागेतील शेतातुन परत तो येडशीकडे परत गेला. वाघ्याचा पायाचा ठसावरुन वनविभागाने अंदाज काढला आहे. तरीही शेतकरी, ग्रामस्थांनी शेतात जाताना-येताना काळजी घ्यावी असे आवाहन विभागाने केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जवळपास गेल्या दोन महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यात वाघाचे दर्शन होत आहे. येडशी व बार्शी येथील काही गावांमध्ये या वाघ दिसून आला होता. वन विभागाने प्रयत्न करूनही अद्याप पर्यंत वाघ सापडलेला नसून, शनिवारी संध्याकाळी कामठा येथील शेतकरी दीपक राऊत हे शेतावरून परत येत असताना गावातील पुलावर त्यांना वाघ आढळून आला. याबाबत त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली असून याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या ज्वारी, गहू, हरभरा काढणी सुरू असून, शेतकऱ्यांनी याबाबत सावध राहण्याची गरज आहे.