कळंब (प्रतिनिधी)-कळंब येथील फ्रेंड्स फॉरेव्हर फाउंडेशन च्या वतीने दि. 1 ते 4 मार्च रोजी कृषी महोत्सव, किसान मित्र कृषी प्रदर्शनाचे तालुका क्रीडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शन आयोजन विषयी जय भवानी मंगल कार्यालय येथे दि. 5 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये कृषी महोत्सवाविषयी माहिती देण्यात आली. कृषी तंत्रज्ञान, ऑटो, डॉग शो, अश्वप्रदर्शन, गाय, बैल प्रदर्शन, फूड फेस्टिवल, इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर,महिला बचत गट गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. यावेळी ऑटोमोबाईल्स अवजारे, डॉग शो, कॅट शो व अश्वप्रदर्शन या प्रदर्शनात ठिबक कंपनी, पशु आहार कंपनी, ट्रॅक्टर कंपनी, कीटक नाशके कंपनी, जैविक खते कंपनी, जैविक बी बियाणे कंपनी, शेती अवजारे कंपनी, सोलार कंपनी व बँका यांचा सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदे प्रसंगी डॉ. अभिजीत लोंढे ,राहुल कवडे, डॉ. गिरीष कुलकर्णी, उदय चंद्र खंडागळे, गोपाळ उबाळे, परमेश्वर मोरे, दिनेश अष्टेकर,प्राचार्य जगदीश गवळी ,मकरंद पाटील, यांची उपस्थिती होती.