भूम (प्रतिनिधी)- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पावसाळ्या पूर्वीच होतील तेव्हा स्वबळावर निवडणूका लढवायच्या असतील तर प्रत्येकांनी इच्छा शक्ती प्रबळ ठेवून, भाजप सदस्य नोदणीत सक्रियता ठेवून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी. असे आवाहन राज्याचे दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी भूम येथे केले.
गुरुवार दि 6 फेब्रुवारी 2025 रोजी येथिल यश मंगल कार्यालयात भाजपच्या महासदस्य नोदणी अभियानची आढावा बैठक राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपारिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी भाजपचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य पाटिल, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, बाळासाहेब क्षिरसागर, राजसिंह राजेनिंबाळकर, इंदजित देवकते, सुदाम पाटिल, विकास कुलकर्णी, महादेव वडेकर, कुकडे महाराज, गणेश खरसडे, गुलचंद व्यवहार, सुरेशा कवडे, बाबासाहेब वीर, संतोष सुपेकर, हेमत देशमुख, शंकर खामकर, सचिन बारगजे, शिवाजी नागरगोजे, सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे, तसेच महिला पदाधिकारी मोठी उपस्थिती होती.
यावेळी प्रत्येकांनी पक्ष पदाधिकारी होणेसाठी अपेक्षित सदस्य नोंदणी करावी. अधिक नोंदणी करा, अपेक्षे प्रमाणे विकास निधी देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास मंत्री नामदार अतूल सावे यांनी बोलताना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विधान सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी मागिल पाच वर्षात सहकारी पक्ष नेतृत्वाकडुन कसलेच सहकार्य झाले नसल्याची खंत व्यक्त केली. प्रसंगी सुत्रसंचलन महादेव वडेकर यांनी केले.