तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर येथे एकाच आठवड्या बुधवार नंतर   शुक्रवार रोजी घडलेल्या दोन अपघाती घटनेने भाविकांची व  शहरवासियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विशेष म्हणजे या दोन्ही घटनेत श्रीतुळजाभवानी कृपेमुळे  एसटी पलटी घटनेत एक महिला भाविक मयत झाली. तरी गॅस सिलेंडर स्फोट घटनेत माञ सय्यद परिवार बाहेर गेल्यामुळे जिवीत हानी झाली नाही. माञ अर्थिक हानी मोठी झाली.

पुणे जिल्हयातील महिला भाविकांची बस घाटशिळ घाटात पलटी झाली. ही बस अजुन तीन फुट पुढे पलटी झाली असती तर माञ पुढे असणाऱ्या दोनशे फुट खड्यात पडून मोठी जिवीत हानी झाली असती. दुसऱ्या घटनेत माञ जिवीत हानी सुदैवाने झाली नसली तरी आर्थिक नुकसान होवुन पाच गरीब कुंटुंब उघड्यावर आले. या कुंटुंबाला अर्थिक मानसिक आधार देणे गरजेचे बनले आहे. या दोन्ही घटना म्हणजे एक प्रकारे प्रशासनाला सुचना देणाऱ्या आहेत.

आजही घाटशिळ घाटातील कठडे गाड्यांची धडक बसले कि जागेवर टीकतील असे नाही. घाटात खड्डे तर आहेत. सांडपाणी ही याच घाटातुन वाहत आहे. कठडे व रस्ते दुरुस्ती नावाखाली संबधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार माञ मालामाल झाले आहेत. यात प्रवासी भाविकांचे माञ हाल झाले आहेत.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील चोही बाजूच्या रस्त्यावर दररोज अपघात घडत आहेत. महामार्ग वाहतुक पोलिस शाखा माञ जिथे दाम तिथे थांब अशा पध्दतीने ड्युटी करीत आहेत. सुरक्षा सप्ताहात अपघात घडत असतील तर सुरक्षा सप्ताह पाळले कशाला जातात असा सवाल प्रवासी भाविकांमधुन केला जात आहे.

तुळजापूर विकास प्राधिकरणातुन अंडरग्राऊड विद्युतपुरवठा यंञणा कोटी रुपये खर्चुन कार्यान्वित केली आहे. तरीही खांबावर शाँर्टसर्कीट होवुन आग लागणे सह अन्य प्रकार सतत कसे घडत आहेत. असा सवाल शहरवासियांमधुन केला जात आहे. ज्याच जळत त्यालाच कळत अशी म्हण प्रचलित आहे. सर्वसामान्यांचे जळत असल्याने ही समस्या मोठ्यांना कशी कळणार असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.


 
Top