तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरातील धाराशिव छत्रपती संभाजीनगर हायवे लगत असणारे स.न. 138/1 या ठिकाणी यात्रा मैदानासाठी दि.28/02/1998 या तारखेला 2 हेक्टर 63 आर इतकी जमीन भुसंपादन झालेली आहे. त्या भूसंपादीत शासनाच्या जागेवर बळजबरीने कपटनितीने व संगणमताने बोगस लेआऊट क्षेत्रात इ आलेले बोगस लेआऊट रदद करून कायदेशीर कार्यवाही करुन त्या ठिकाणी भाविकासाठी यात्रा मैदान होण्याच्या मागणीसाठी महिलांना बायपास पुलाजवळ राञी पालकमंञी यांना मागणीचे निवेदन दिले. त्यांनी संबंधित अधिका-यास बोलवुन या प्रकरणी सविस्तर माहीती मला दोन दिवसात देण्याची सुचना दिली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक पुर्ण शक्तीपीठ आहे. त्या ठिकाणी स.न. 138/1 याक्षेत्रावर तुळजापूर येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शासनाने 28/08/1998 या तारखेला हे भुसंपादन केलेले असताना या क्षेत्रावर तुळजापूर नगरपरिषदेच्या नगरसेवकाने ( मा. उपाध्यक्ष) यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर करुन बेकायदेशीर संगणमताने लेआऊट तयार करुन ती जमीन विक्री करुन गिळंकृत केलेली आहे. ज्या उददेशाने हे भुसंपादन झालेले आहे. तो शासनाचा उददेश सफल होताना दिसून येत नाही. तसेच तुळजापूर शहरातील पुजारी बांधवाच्या जिव्हाळयाचा व भावनेचा प्रश्न आहे. भाविक भक्तांना या ठिकाणी सोईचे होईल व जवळच पाचशे मीटर अंतरावर देवीजीचे मंदिर आहे. असुन या प्रकरणी आपण योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.