तुळजापूर (प्रतिनिधी)- पालकमंत्र्याच्या दौ-या दरम्यान ड्रग्ज विरोधात तक्रार केल्याच्या कारणावरुन तुळजापुर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी
निलेश देशमुख यांनी धमकावल्याचा निषेधार्थ शुक्रवार दि २१रोजी तहसिल कार्यालय येथे शहरवासियांन तर्फ ऐक दिवसाचे लाक्षणिक उपोषण शहरवासियांचा वातीने आयोजित केले आहे.
शहारात अनेक वर्षांपासुन अंमली पदार्थ विक्री होत
असलेबाबत मा. ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे या अंमली पदार्थाबाबत तुळजापुर वासियांनी भेटुन तक्रार केली असता व मा. ना. मंत्री महोदयांनी मिटींगमध्ये ७२ तासात याचा अहवाल मागविला असता. त्याच ठिकाणी श्री. तुळजाभवानी मंदीर कार्यालयात DYSP निलेश देशमुख यांनी पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. विपीन
• शिंदे यांना तुम्ही खोटी माहिती देत आहात आणि मीच तुमच्यावर तरतुदी नुसार कारवाई करीन असे प्रत्यक्ष धमकी दिली आहे. म्हणजेच एखाद्या नियमबाह्य गोष्टीची तक्रार दिल्यास तक्रारदाराचे खच्चीकरण करणे चालु आहे. म्हणजेच आम्ही जे आरोप पोलिस प्रशासन तुळजापुर यांच्या वरती केलेले आहेत की पोलिस तक्रारदाराचे म्हणने ऐकुन न घेता आरोपीस हमेशा पाठीशी घालते हे वरील घटनेवरुन सिध्द होते तरी या प्रकरणी श्री. तुळजाभवानी मंदीर कार्यालयातील CCTV फुटेज मध्ये सदरील प्रकार चित्रीत झालेला आहे. "अशा प्रकारे न्याय मागणाऱ्यावरतीच कारवाई करणाऱ्याचे प्रयत्न व धमकी देणाऱ्या व असे प्रकार पुढे होऊन नयेत व या घटनेचा निषेध करण्यासाठी तुळजापुर तहसिल कार्यालयासमोर वार शुक्रवार दि. 21/02/2025 रोजी एक दिवसाचे तुळजापुर
वासिय लाक्षणिक उपोषण आयोजित केले आहे तसेच तुळजापूर शहरामध्ये चोऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने व आपले तुळजापूर येथे तिर्थक्षेत्र असल्याने शहात दररोज लाखो भाविक देविच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे शहरातील अवैद्य धंदे, गुंडागर्दी, होणाऱ्या चोऱ्या यांना पोलीस प्रशासनाने आळा घालुन तुळजापूर शहर हे भयमुक्त करावे अशी विनंती जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन देवुन केलीआहे.