धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात व शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. धाराशिव शहरात मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे उपस्थित होते. 

गेल्या एक आठवड्यापासून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त शहरात सर्वत्र भगवे ध्वज लावण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मेघडंबरी बसवण्यासोबतच परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. दुपारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. 


शिवमुर्तीचे सहकार मंत्री पाटील हस्ते पुजन

तुळजापूर येथील  जय भवानी तरूण मंडळ व जाणता राजा युवा मंच मध्यवर्ती शिवजन्मोत्सोव समितीच्या शिवमुर्तीचे बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी पुजन करुन आरती महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी मंञी पाटील यांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष अमोल कुतवळ यांनी केले. या प्रसंगी सुरेश बिराजदार, महेंद्र धुरगुडे, गोकुळ शिंदे, श्रीकृष्ण  सुर्यवंशी, मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन वाघमारे, समाधान परमेश्वर, प्रविण कदम, संजय लोंढे, नागेश किवडे, बाबा मस्के, किरण पाठक, पोफळे आप्पा सर्व मंडळाचे सभासद. शिवप्रेमी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top