तुळजापूर (प्रतिनिधी) - नगरपरीषद वाहनतळ ठेका दि. 8 फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर सध्या राञी 12 ते8 या वेळेत वाहनतळ बनावट पावत्या घाटशिळ वाहनतळ परिसरात फाडुन भाविकांची लुट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने या बनावट पावत्या फाडणा-यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या रस्त्यावर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज पाहुन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वेमार्गावर नसल्याने भाविक मोठ्या संखेने खाजगी वाहनांनी येतात. तिर्थक्षेञी गर्दी दिनी पंधरा ते वीस हजार वाहने तुळजापूरात येतात. वाहनतळ मुदत संपल्याने ठेकेदाराचे चाळीस ते पन्नास ठेकेदाराचे कामगार रस्त्यावरून बाजुला झाले नगरपरीषदचे अवघे आठ कामगार वाहनतळ पावत्या फडत होते. ते ही वाहनतळात आलेल्या वाहनांचेच फडत होते. वाहनतळ भरताच त्यांनी पावत्या फाडणे बंद केले. रविवारी गर्दी होणार असल्याने नगरपरीषद जादा कामगार लावणे गरजेचे होते.
गर्दी दिनी रविवारी शहारात प्रवेश करणारे वाहनांमधील ऐंशी टक्के वाहने घाटशिळ वाहनतळाकडे आल्याने वाहनतळ फुल्ल होताच वाहनतळ बंद करण्यात आले. या वाहनतळाकडे येणाऱ्या वाहनांची रस्त्यावर प्रचंड रांग लागुन वाहतुक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी दूर होत नसल्याने येथे भाविकांना याचा प्रचंड ञास सहन करावा लागला.
ठेका संपल्याने रविवारी शहरातील वाहतुक कोंडी होवु नये म्हणून शहरातील शुक्रवार पेठ, पाणी टाकी हाडको, उध्दवराव पाटील सभागृह येथे पोलिसांनी वाहने सोडणे नियोजन करणे गरजेचे होते. पण तसे न केल्याने या बाबतीत दक्षता न घेतल्याने सगळे वाहने घाटशिळ वाहनतळाकडे गेल्यामुळे घाटशिळ वाहनतळ रोड, भवानी रोड, छञपती शिवाजी महाराज चौक येथे वाहतुक कोंडी होत होती.