धाराशिव (प्रतिनिधी)- संस्कृती, शक्ती व एकतेसाठी.. चार पावलं स्वतःसाठी ! हे ब्रीद घेऊन येथील महिला संघटनांनी साडी वाकॅथॉनचे आयोजन धाराशिव शहरांमध्ये केले होते. शहरातील भव्य अशा स्टेडियमवर सकाळी बरोबर सहाला सुरू झालेल्या या साडी वाकॅथॉनची सांगता लकी ड्रॉ च्या भरघोस बक्षीसाच्या माध्यमातून झाली.
गणेश वंदनेने सुरुवात झालेल्या या साडी वाकॅथॉनच्या उद्घाटनासाठी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेश साबू, विश्व विजेत्या खो-खो संघाची धाराशिवची सुकन्या अश्विनी शिंदे, धाराशिव रोटरीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम जिंतुरकर, ओस्लाच्या अध्यक्ष आणि कार्यक्रमाच्या मुख्य प्रवर्तक किरण देशमाने, डॉ. अनार साळुंखे , डॉ.रेखा ढगे, डॉ. सुलभा देशमुख, डॉ. कौशाली राजगुरू, डॉ. श्रद्धा मुळे, सुप्रिया दूधभाते, डॉ. अस्मिता बुरगुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
श्रावणी व्यास यांच्या ग्रुपने महिला सक्षमीकरणावर नृत्य सादर केले. यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सुरेश साबू आणि श्रीराम जिंतूरकर यांनी वाकॅथॉन साठी सज्ज असलेल्या महिलांना हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर या अंतरावर असलेल्या या साडी वाकॅथॉन साठी महिलांनी सकाळच्या प्रसन्न वातावरणात चालून आनंद घेतला. यावेळी संपूर्ण शहरभर भारावलेल्या वातावरणात महिला चालत होत्या. उपस्थित इतर महिलांनीही याचा आनंद घेतला.
संयोजनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि शुभांगीताई कैलास पाटील यांच्या हस्ते लकी ड्रॉ मधील विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. या संपूर्ण साडी वाकॅथॉनसाठी विशेष मेहनत घेतलेल्या कमलताई नालावडे, नीता कठारे, डॉ. मीना जिंतूरकर, मेधा चोराखळीकर, स्नेहलता झरकर,शर्मिष्ठा डांगे,वर्षा हंबीरे, सी.ए. शितल कोठारी, डॉ दीपाली रामढवे ,दमयंती साळवी,प्रा.डॉ. पूनम तापडिया, आरती अजमेरा यांचाही यथोचित सन्मान झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता गुंजाळ आणि डॉ. श्रद्धा मुळे यांनी केले.