तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील देवकुरुळी येथील ऐका शेतकऱ्याच्या शेतातील काढणीस आलेल्या कलिंगड्याच्या सहा हजार रोपा पैकी चार हजार रोपांना आलेले कलिंगडीस अज्ञाताने सळइ, राँड सदृश्य हत्याराने होल पाडून दोन लाख रुपयाचे नुकसान केल्याची घटना शुक्रवार  दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी  राञी घडली.

या बाबतीत अधिक माहीती अशी कि. तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील युवा शेतकरी सचिन बंडू चव्हाण याने दोन महिन्या पुर्वी गट नंबर 331 मधील आपल्या शेतात कलिंगडी लावली. माल काढणीस आला. व्यापारी वर्गाने माल पाहला रविवारी या मालाचा सौदा करायाचा म्हटल कि, शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी राञी चव्हाण परिवार घरी येताच अज्ञाताने शेतातील सहा हजार रोपांपैकी चार हजार रोपांवरील कलिगडास सळई, राँड सदृश्य हत्याराने बोके पाडली. यात शेतकऱ्याचे सुमारास दोन लाख रुपयाचे नुकसान झाले.


 
Top