धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता समुहातील मनोरमा रूपामाता नॅचरल गुळ पावडर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली. यंदा पाडोळी, माजलगाव व देवसिंगा तिन्ही गुळ पावडर कारखान्याची मिळून 1 लाख 91 हजार टन उसाचे गाळप रूपामाता समूहाने केले. त्यापैकी आज पर्यंत देवसिंगा कारखाना येथे 36 हजार 800 टन गाळप करण्यात आले असून रविवारी या गळीत हंगामाची सांगता करण्यात आली.
ंस्थापक अँड व्यंकटराव गुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या हंगामात देवसिंगा येथील कारखान्याने एकूण 36 हजार 800 मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले. 20 डिसेंबर पर्यंत उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. भविष्यातील हंगाम अधिक सुव्यवस्थित आणि शेतकरी हितकारी करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे अँड. व्यंकटराव गुंड यांनी सांगितले. यावेळी चिफ इंजि. काटे, चिफ केमि. जाधव, ऊस पुरवठा अधिकारी जंगाले, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव गुंड तसेच कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, उस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार, वाहन मालक उपस्थित होते.