भूम (प्रतिनिधी)- श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचा भूम येथे तीन दिवसाचा कार्यक्रमाचे आयोजन संत गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.  दि. 18  फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराज ग्रंथराज पारायण सुरुवात, चौंडेश्वरी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, हरिजागर कोरेगाव भजनी मंडळ, दि. 19 फेब्रुवारी रोजी गुरुमाऊली महिला भजनी मंडळ, हरिजागर भजनी मंडळ कार्यक्रम, दि. 20 फेब्रुवारी रोजी अभिषेक महापूजा, वारकरी भूषण  हभप संभाजी महाराज गाडे यांचे काल्याचे किर्तन, प्रकट सोहळा व महाआरती आणि महाप्रसाद यासाठी मृदंगाचार्य हभप दत्ता महाराज सोनवणे, बाबासाहेब पांचाळ,गायनाचार्य हभप महादेव महाराज बैरागी लोणी,रामभाऊ महाराज निपाणीकर,टाळकरी दिंडोरी भजनी मंडळ व भूम भजनी मंडळाच्या वतीने करण्यात येणारा आहे. तरी याचा लाभ भूम शहरातील व तालुक्यातील भावी भक्तांनी घ्यावा असे आवाहन संत गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

 
Top