धाराशिव  (प्रतिनिधी)- क्रीडा विभागातर्फे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२३-२४ साठी गुणांकन प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.या संदर्भात हरकती व सूचनांसाठी मागविण्यात आल्या आहेत.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खेळाडू,प्रशिक्षक व क्रीडा क्षेत्रातील अन्य व्यक्तींना प्रदान केला जातो.महाराष्ट्र शासनाने १९ डिसेंबर २०२३ व ९ जानेवारी २०२४ रोजी सुधारित नियमावली जारी केली असून,यानुसार अर्जांची तपासणी आणि गुणांकन प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली आहे.

त्यानुसार,पुरस्कारांसाठी अर्ज केलेल्या व्यक्तींचे प्राथमिक गुणांकन शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://shivchhatrapatiawards.com) प्रसिद्ध करण्यात आले आहे. अर्जदारांना कोणतीही हरकत अथवा सूचना असल्यास १८ फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल.

सूचना व हरकती सादर करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी २०२५ (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) अर्जदारांनी दिलेल्या अंतिम गुणांकनानंतर कोणताही बदल करता येणार नाही.त्यामुळे इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी आपल्या सूचना व हरकती ऑनलाइन https://shivchhatrapatiaward.com सादर कराव्यात.अधिक माहितीसाठी व गुणांकन तपासण्यासाठी वरील संकेतस्थळाला भेट द्यावी.असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी कळविले आहे.

 
Top