तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्पेशल येथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष  अमोल थोडसरे व उपाध्यक्ष  नामदेव कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थी, पालक , ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते तसेच हिरव्या पालेभाज्या, स्टेशनरी साहित्य व फनी गेम अशा विविध दुकानांनी ग्रामस्थाचे व पालकांचे लक्ष वेधले या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कमवा व शिका या उपक्रमातून प्रत्यक्ष आर्थिक ज्ञान मिळण्यास मदत झाली. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्व दुकानाची मिळून अंदाजे आर्थिक उलाढाल 35000 रू एवढी झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेब पवार  यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक  राऊत यु. जी. ,  मारवडकर टी. के.. शिंदे एम.एन. नागलबोने एस.डी. ,. देवारे जे. डी. ,. धुमाळ ए. बी. , निकम के. एम.,. देशमुख ए. ए. ,. पाचभाई जे. आर. , कांबळे डी. ए. इत्यादींनी परिश्रम घेतले.

 
Top