भूम (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भूम येथे आयोजित रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागोबा मंदिर येथे भरवलेल्या या शिबिरात तब्बल 137 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या सामाजिक उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळाला.
शिवजयंतीनिमित्त केवळ रक्तदान नव्हे, तर इतरही सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोजार मूकबधिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना कपडे, वह्या आणि जेवण वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, लकी ड्रॉ सोडतीद्वारे भाग्यवान विजेत्यांना पैठणी साड्या आणि आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत.
शिवजन्मोत्सवाचा पारंपरिक उत्सव, शिवजयंतीचा उत्सव पारंपरिक आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
तर दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून, दुपारी 4 वाजता शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाजत-गाजत निघणार आहे. युवकांचा उत्स्फूर्त सहभाग रक्तदान शिबिर तसेच संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष आदित्य भोळे, उपाध्यक्ष ओम पिसाळ, अभि जिकरे, अर्जुन जाधव, खजिनदार शुभम होळकर, मिरवणूक प्रमुख ऋतिक वीर, प्रवीण शेंडगे, अमित मस्कर, अभि पोळ, अभि शेटे, प्रतीक मस्कर, प्रदीप शेंडगे, नितीन नाईकवाडी, राहुल शेंडगे आणि अनेक शिवभक्तांनी मेहनत घेतली.