भूम (प्रतिनिधी)- भूम न्यायालयात कार्यरत असलेले कर्मचारी राजेंद्र गंगाधर पाटील (वय 48) यांचे प्रवासादरम्यान एस.टी. बसमध्ये आकस्मिक निधन झाले. ते न्यायालयात बिलीप (नोटीस बजावणारे) या पदावर कार्यरत होते. त्यांच्या या दुर्दैवी निधनामुळे न्यायालय परिसरात तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

उपचारासाठी बार्शी येथे गेले होते, मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र पाटील हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांनी बार्शी येथील संजय अंधारे हॉस्पिटलमध्ये तपासणी करून औषधोपचार घेतले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी औषधं घेतल्यानंतर ते परत भूमला जाण्यासाठी बार्शी-कोरेगाव-भूम एस.टी. बस (क्रमांक  14  1949) मध्ये बसले.

बस प्रवासातच मृत्यू, बस प्रवासादरम्यान भूम शहराच्या जवळ पोहोचत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. भूम बस स्थानकावर पोहोचल्यानंतर सर्व प्रवासी खाली उतरले, मात्र राजेंद्र पाटील खाली उतरले नाहीत. त्यामुळे बस कर्मचाऱ्यांनी त्यांना हालचाल करून पाहिले, परंतु त्यांची कोणतीही प्रतिक्रिया नव्हती.

वैद्यकीय तपासणीअंती मृत घोषित, घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल शबाना मुल्ला घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्राथमिक तपासणी करून परिस्थिती समजून घेतली. तातडीने वैद्यकीय मदतीसाठी भूम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉ. वैद्यकीय अधिकारी मंगेश काळे  तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. न्यायालयात शोककळा ,राजेंद्र पाटील यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त मिळताच भूम न्यायालयातील सर्व न्यायाधीश आणि वकील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. कर्तव्यदक्ष आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते न्यायालयात सर्वांना प्रिय होते. त्यांच्या निधनामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांत आणि सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर, राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले असून, नातेवाईक आणि सहकाऱ्यांकडून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

 
Top