भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे समतेचे महानायक संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने हाडोंग्री ग्रामपंचायत व समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर त्यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी पंचायत समितीचे सदस्य मुक्तप्पा तळेकर सरपंच संदीप मगर उपसरपंच रवींद्र लोमटे ग्रामसेविका नीलम जानराव प्रशांत कदम भगवंत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अनिल तळेकर यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दादासाहेब रामगुडे संतोष शिंदे बालाजी रामगुडे महादेव शिंदे अनंतराव रामगुडे नरेंद्र रामगुडे भाग्यवंत रामगुडे सनी रामगुडे अनिकेत रामगुडे किरण टेकाळे निलेश टेकाळे शरद कसबे भरत सुरवसे अशोक वाघमारे युवराज शिंगटे सुनिल तळेकर महादेव तळेकर चंद्रसेन रामगुडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

 
Top