धाराशिव (प्रतिनिधी)-  पोलीस ठाणे येरमाळाचे हद्दीतील मौजे वडगाव येथील रामभाउ गहिनीनाथ नवले हे त्यांचे शेतात दैनंदिन कामकाजाकरीता गेले असता अज्ञात इसमाने त्यांचे घराचे दरवाजचा लोखंडी कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम एकुण 15 लाख 79 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत स्थानिक गुन्हा शाखेने कसून तपास करून दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपी जेरबंद केले आहे. 

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्ह्याबाबत सखोल तपास करण्याचे आदेशित केले. दि.12 फेब्रुवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणातुन आरोपीचा शोध घेतला. याबाबत त्यांनी तात्काळ अधिक खात्री केली असता  नमुदचा गुन्हा आरोपी नामे सुरज दादासाहेब शिनगारे रा. शेलगाव, ता. कळंब जि. धाराशिव यांने केल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ नमुद इसमाचा शोध घेवून त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषांगाने चौकशी केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे कडे अधिक चौकशी केली. त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देवून चोरीचे मुद्देमालाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला सर्व माहिती दिली. सदर पथकाने तात्काळ चोरी केलेले 18 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 40 हजार रूपये व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकुण 15 लाख  9 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. नमुद आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकामी पोस्टे येरमाळा येथे हजर केले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे धाराशिवचे सपोनि सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, मपोह शैला टेळे, पोअं योगेश कोळी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले  यांच्या पथकाने केली आहे.


 
Top