परंडा (प्रतिनिधी) - येथील डी.बी.ए.समुहच्या वतीने शासकीय विश्रामगृह परंडा येथे गुरुवार दि.12 रोजी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठया उत्साहात करण्यात आली.याप्रसंगी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून प्रमुख पाहुण्यांनी सामुदायिक पूजन केले. 

यावेळी डी.बी.ए समूहचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे, महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे तालुका अध्यक्ष  कानिफनाथ सरपणे, वंचित बहुजन आघाडी महासचिव धनंजय सोनटक्के,वंचित बहुजन आघाडी कार्यकारणी सदस्य तानाजी बनसोडे, प्रहारचे जिल्हा संघटक नानासाहेब नरोटे,पत्रकार फारुख शेख, पत्रकार निसार मुजावर, पत्रकार भुजंगदास गुडे, शहराध्यक्ष उमेश सोनवणे,ॲड दयानंद धेंडे,एडवोकेट रवींद्र सोनवणे, महाराष्ट्र सुरक्षा दल कामगार संघटना तालुकाध्यक्ष अतुल सोनवणे,वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष किरण बनसोडे, डी. बी. ए. समूह मीडिया अमर गायकवाड, धर्मराज नरोटे, हरिभाऊ गोडगे, हरिदास राऊत,शिवदास राऊत, कालिदास काशीद, समाधान कांबळे, राजकुमार वाघमारे,अंकुश शेंडगे, तसेच प्रतिष्ठीत नागरिक व व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थितांच आभार  दयानंद बनसोडे यांनी मानले.

 
Top