तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मंदीर स्वानिधीतुन गाभाऱ्यात होणारी  कामे भाविकांच्या कमी वेळात सुलभ दर्शन घडविण्यासाठी महत्त्वाची असल्याने ते लवकर होण्यासाठी पुजारी मंडख, मंदीर प्रशासन, पुरातत्व विभागाने पाठपुरावा करावा. असे प्रतिपादन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी निरोप समारंभात केले.

प्रारंभी डॉ. सचिन ओंबासे यांचा सपत्नीक देविचा फोटो देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे, संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने तसेच मंदिर संस्थानचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. ओम्बासे म्हणाले कि, श्रीतुळजाभवानी मंदीरात स्वनिधीतील मंजूर विकास कामे दरवाजे, मंदीर रुंदीकरण सह अनेक कामे भावीकांना कमी वेळात देविचे सुलभ दर्शन मिळण्यासाठी महत्त्वाची आहेत ते तात्काळ पुर्ण करा. वेळ लावला तर याचा फटका भाविकांना सुलभ दर्शन न मिळुन बसणार आहे. त्यामुळे पुजारी मंडळे, मंदीर प्रशासन व पुरातत्व विभागाची कामे पुर्ण करण्याची जबाबदारी असल्याने यासाठी पाठपुरावा करुन कामे लवकर करुन घ्या. असे शेवटी आवाहन केले. यावेळी मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी यांच्या कार्यपद्धती बद्दल कौतुक करताना मंदिर संस्थान बाबत मार्गदर्शन पुढेही मिळावे अशी विनंती केली. 

 
Top