तुळजापूर (प्रतिनिधी)- हिदुंचे पविञ धार्मिक स्थळ असलेले साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून देशभर प्रसिद्ध असे तिर्थक्षेञ तुळजापूर अवैध धंद्यामुळे बदनाम झाल्याने नुतन पोलिस निरक्षक अण्णासाहेब मांजरे यांना या धार्मिक क्षेञी शांतता, कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे.
स्ञीशक्ती देवता असलेल्या श्रीतुळजाभवानी नगरीचा सर्वाधिक ञास हा महिला वर्गास सहन करावा लागत आहे म्हणून तर त्यांनी थेट ड्रग्ज प्रकरणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना माहिती दिल्याने ड्रग्ज रँकेट समोर आले. अवैध धंदे विरोधात शहरवासियांना एकवटावे लागले. या काळात तक्रारदारांना थेट कारवाईच्या धमक्या पोलिस अधिका-यांकडुन दिल्या गेल्याने पोलिस बाबतीत जनक्षोभ वाढत गेला. श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ देशभरातुन चोवीस तास कोट्यावधी भावीक दर्शनार्थ येत असल्याने येथे कायमच गर्दी असते. परंतु मागील काही वर्षापासुन तुळजापूरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे शहर पोलीसांच्या नाकर्तेपणामुळे निघाले असुन शहर परीसरात घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचींग, मोटार सायकल, मोबाईल चोऱ्या ड्रग्ज, शहर बाहेर चालणारे मोठमोठे जुगार अड्डे, मटका, शेतकऱ्यांच्या मोटार वायर चोऱ्या, फसवणूक या सारख्या अवैध धंदेत प्रचंड वाढ झाली आहे.
सतत शहरात घरफोडी व जबरी दरोडे पडण्याच्या घटना नित्यनेमाने घडु लागल्या आहेत. त्यामुळे शहरवासी भयभीत असुन चोरांच्या भितीपोटी नागरीक रात्रभर न झोपता घराची सुरक्षा करण्यासाठी जागता पहारा देत आहेत. परंतु पोलीस प्रशासन मात्र नुसते चोरीचे एफआयआर नोंदवुन कागद काळे करुन कारवाईचे नुसते सोंग करुन नागरीकांच्या तोंडाला पाने पुसण्याच काम करत आहेत. शहरातील अपसींगा रोड व नळदुर्ग रोडलगत वस्ती विरळ असल्याने सगळ्यात जास्त चोऱ्या या भागात होत आहेत. हे चोर चक्क आता शहरात घुसले असुन यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. नागरिक शांतपणे रात्रभर झोपुच शकत नाही अशी अवस्था या भागात झाली आहे. गत सहा महीन्यात शेकडो चोऱ्या-घरफोड्या या भागात झाल्या असून आतापर्यंत एकाही चोरीचा छडा पोलीसांनी लावल्याचे ऐकण्यात नसल्याची खंत नागरीक उघडपणे बोलुन दाखवत आहेत. परंतु प्रश्न असा आहे की शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी, घरफोडी, दरोडे होऊनसुद्धा पोलीसांना आरोपी सापडत नाहीत हे वास्तव नाकारता येणार नाही.