भूम - गण गणात बोतेच्या जयघोषात येथील वाशी रोडवरील गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला.
प्रकट दिनाच्या उचित्याने गजानन महाराज यांच्या मूर्तीस पहाटे महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर वारकरी भूषण हभप संभाजी महाराज गाडे मेहुणकर यांचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर दहीहंडी, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. प्रकट दिनानिमित्त मागील तीन दिवसापासून मंदिरात महिला भजनी मंडळातर्फे भजनाचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता. प्रकट दिन कार्यक्रमासाठी श्री संत गजानन महाराज व्यापारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले. यावेळी व्यापारी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप गाढवे, सचिव दीपक खराडे, जयेंद्र मैदर्गे, बाबासाहेब घुले, अमोल तुळशी, अरविंद शिंदे, राम मुंडेकर, विकास माळवदे, आबा घुले, सचिन साळुंके यांच्यासह भाविक उपस्थित होते.