भूम - शंकरराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच पार पडली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यानी कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठातील विविध विभागांना भेट दिली. तसेच शाहू पॅलेस म्युझियम, किल्ले पन्हाळगड, महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, मत्स्यशास्त्र संग्रहालय, गणपतीपुळे, रायगड, प्रतापगड, डेरवण शिवसृष्टी, महाबळेश्वर या ठिकाणांना भेट देऊन पाहणी करण्यात आली. सहलीमध्ये आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी आपल्या अहवालमध्ये महाविद्यालयात सादर केले आहेत. सहल यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दयानंद शिंदे, सहल विभागप्रमुख टी. आर. बोराडे, गोपाल खंदारे प्रा. रमेश गायकवाड, प्रा.अनुराधा जगदाळे प्रा. पूनम सुतार, प्रा. जयेश मसराम, प्रा. राहुल राठोड, प्रा.नंदकिशोर जगदाळे यांचे सहकार्य लाभले.