धाराशिव (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात सातत्याने बदल घडत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे व त्याचे संवर्धन करणे ही काळाची मोठी गरज असल्याचे प्रतिपादन धाराशिव प्रशालेचे मुख्याध्यापक पंडित जाधव यांनी केले.

कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव येथील बीएडच्या आंतरवासिता व सराव पाठासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थींनी सांजावेस येथील धाराशिव प्रशालेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री.पंडित जाधव बोलत होते. वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान शाळेच्या आवारात ठिकठिकाणी विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी कॉलेज ऑफ एज्युकेशनचे समन्वयक नवनाथ धुमाळ, डॉ.ज्ञानेश्वर पवार, सुहास गुळवे, बाळासाहेब इसाके, मदन गिरी यांच्यासह कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्रशिक्षणार्थी, धाराशिव प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top