धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील तांबरी विभाग येथील रहिवासी शितल पंचशील लोकरे - वाळवे (वय 39 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार 21 फेब्रुवारी दुपारी हैद्राबाद येथे निधन झाले. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर धाराशिव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू-सासरे,आई- वडील, भाऊ, असा परिवार आहे. माजी सैनिक दत्तू वाळवे यांची ती कन्या होत.