धाराशिव (प्रतिनिधी)- सामान्य कुटुंबातील विद्यार्थी सुद्धा जिद्द व चिकाटीच्या बळावरच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकतात असे प्रतिपादन प्रा. सोमनाथ लांडगे यांनी “डॉक्टर घडवणारे शिक्षक“ या कार्यक्रमात प्रगट मुलाखत देताना व्यक्त केले. 

पुढे आपल्या मुलाखतीमध्ये आई-वडिलांची ही मुलांना घडवण्यामध्ये मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पालकांनी योग्य रीतीने पूर्ण करावी तरच आपली मुलं यशस्वी होण्यास मदत होईल, मुलांना मानसिक ताण होणार नाही या पद्धतींचा पालकांचा मुलाप्रती प्रतिसाद असावा असेही प्रतिपादन केले. प्रा. सोमनाथ लांडगे यांची पुणे येथील बाळासाहेब ठाकरे कलादालन पुणे येथे ही प्रकट मुलाखत झाली. प्रबोधन युवाशक्ती व सोनई शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री साई श्रध्दा एज्युकेशन,  नीट ऑनलाइन टेस्ट सिरीज यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आला होता. ख्यातनाम व्यख्याते व लेखक प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी ही प्रकट मुलाखत घेतली. यावेळी पालक व विद्यार्थी यांनी विचारलेल्या प्रश्नाला समयोचीत समाधान प्रा. सोमनाथ लांडगे यांनी केले.

या प्रकट दिमाखदार प्रकट मुलाखतीचे सूत्रसंचालन ॲड. महारुद्र जाधव यांनी केले तर या मुलाखतीला प्रमुख पाहुणे म्हणून सोनई शिक्षण संस्थेचे प्रमुख राहुल मोकाशी, वृंदावन फाउंडेशनचे सचिन पाटील, हभप. प्रसाद माटे महाराज, अविनाश अभंगराव, प्राचार्य गायकवाड मॅडम विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top