धाराशिव (प्रतिक्रिया) - तालुक्यातील सांजा येथे नमा आशाकिरण सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव, साहित्य तर शालेय विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण यंत्र (आरो प्लांट), शालेय साहित्य व क्रीडा साहित्य आदींचे वाटप करण्यात आले. यामध्ये  एक लाख किंमतीचे तासी 250 लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण यंत्र, शाळेतील विद्यार्थ्यांना 35 हजार रुपयांचे क्रीडा साहित्य तर बाल वाचनालयासाठी 500 अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली.

या कार्यक्रमास नमा आशाकिरण संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ बांगर, कॅशियर मल्लप्पा, सदस्य, हरिदास माने, जि प उप अभियंता काळे, वैद्यकीय अधिकारी तेरकर, ग्रामसेवक एकनाथ माने, जि प अभियंता आवड, शिक्षक पडवळ, पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमास उपसरपंच सतीश सुर्यवंशी, सदस्य राजदीप गायकवाड, राकेश कचरे, प्रवीण जकाते, हरी इंगळे, अमर शिंदे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उंबरे यांनी तर उपस्थितांचे आभार मारुती कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रणजीत कदम, राकेश सुर्यवंशी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास उपसरपंच सतीश सुर्यवंशी, सदस्य राजदीप गायकवाड, राकेश कचरे, प्रवीण जकाते, हरी इंगळे, अमर शिंदे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top