परंडा (प्रतिनिधी) -भाजपा दिव्यांग आघाडीचे परंडा तालुकाध्यक्ष, आंदोरा-आंदोरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक महादेव बारसकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आंदोरी येथे बारसकर कुटुंबियांची सांतवनपर भेट घेतली.
यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीर चौधरी,भाजपा ओबीसी मोर्चा धाराशिव जिल्हा मा. उपाध्यक्ष साहेबराव पाडुळे, आंदोरा-आंदोरी चे मा. सरपंच व भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण शिंदे,समरजीतसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.