धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने श्रीपतराव भोसले महाविदयालयातील इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेली  अश्विनी शिंदे सह अन्य खेळाडूंची धाराशिव शहरात भव्य मिरवणूक काढून श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये भव्य सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक खो-खो स्पर्धेतील विजेत्या संघातील अश्विनी शिंदेसह इतर खेळाडू व प्रशिक्षकांची छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजाऊ चौक अशी भव्य मिरवणूक खुल्या जिप्सीमधून काढण्यात आली. यावेळी चौका चौकात व रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. या रॅलीचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. 

पहिल्या जागतिक अजिंक्य खो -खो स्पर्धेचे आयोजक व व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी केल्याबद्दल महाराष्द्र खो-खो अशोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांचा संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रथम आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक विजेती अश्विनी शिंदे व इतर अन्य खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचा शाल, देवीची प्रतिमा व के.टी. पाटील यांचे सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, डॉ. मंजुळाताई पाटील, उद्योजक विक्रम पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, प्राचार्य डॉ. गोरख देशमाने, उपप्राचार्य संतोष घार्गे,  उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांच्या हस्ते विजेते खेळाडू अश्विनी शिंदे, गौरी शिंदे, सुहानी धोत्रे, संध्या सुरवसे, रोहीत चव्हाण, विराज जाधव, प्रशिक्षक प्रवीण बागल, अभिजित पाटील, विवेक कापसे, प्रभाकर काळे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी युवा उदयोजक अभिराम पाटील, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय जाधव व सूर्यकांत पाटील यांनी केले.

 
Top