धाराशिव (प्रतिनिधी)-  डेहराडून उत्तराखंड येथे होत असलेल्या 38 व्या नॅशनल गेम्स साठी धाराशिव जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले यांची ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातून महाराष्ट्रा राज्याच्या प्रशिक्षक(कोच) म्हणून निवड झाली आहे. 

नॅशनल गेम्स मध्ये 38 खेळाडू , 3 टीम कोच आणि 4 टीम मॅनेजर असे एकूण 45 जणांचा चमू सहभागी होणार असून, 08 ते 12 फेब्रुवारी दरम्यान डेहराडून(उत्तराखंड) येथे स्पर्धा होणार आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे सदरील खेळाडूंचा कॅम्प घेण्यात आला असून बुधवारी संघ उत्तराखंडला रवाना होणार आहे.

दरम्यान योगेश थोरबोले यांचा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी धाराशिव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन चे अध्यक्ष भरत जगताप,महाराष्ट्र राज्य सायकलींग संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर, यांच्यासह खेळाडू पालक यांचे उपस्थिती होती.

 
Top