मुरुम (प्रतिनिधी)- येथील स्व. गंगादेवी माधवराव पाटील यांची मंगळवारी ( ता. 4 ) रोजी चौथे पुण्यस्मरण श्री माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे साजरे करण्यात आले. स्व. मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. दयानंद बिराजदार, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. अविनाश मुळे, डॉ. शिला स्वामी, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. राम बजगिरे, डॉ. महेश मोटे, डॉ. नागोराव बोईनवाड, प्रा. गोपाळ कुलकर्णी, अशोक कलशेट्टी, विजयालक्ष्मी भालेराव, राजू ढगे, दत्तू गडवे, महादेव पाटील, डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. अशोक बावगे, प्रा. अरुण बावा आदींची उपस्थिती होती. प्रा. अजिंक्य राठोड, प्रा. पायल आगरकर, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. विनंती बसवंतबागडे, प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. सदफअलमास मुजावर, प्रा. प्रियंका काजळे आदींनी पुढाकार घेतला. प्रतिभा निकेतन विद्यालयात मुख्याध्यापक करबसप्पा ब्याळे, उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, परिवेक्षक विवेकानंद परसाळगे, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, सच्चिदानंद अंबर, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, भुसणीचे मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे तर नूतन विद्यालयात राजशेखर कोरे, लक्ष्मी पवार आदींच्या हस्ते मातोश्री गंगादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन प्राथमिक शाळा, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, मुरुम आदी विद्यालयातही अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांनी प्रतिकूल काळात स्वर्गीय माधवराव (काका) पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे राज्याचे सक्षम नेतृत्व करत सामाजिक-राजकीय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे. तर
दुसरे चिरंजीव धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील हे सहकार क्षेत्रातून जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. कृषी व शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे नातू शरण पाटील राज्यभर युवकांची बांधणी करून युवकांचे संघटन वाढवीत आहेत. उमरगा जनता बँकेच्या माध्यमातून तरुणांना अधिक व्यवसायभिमुख बनवून सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. या सर्वांना सुसंस्कारित विचार देण्यामध्ये मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला, असल्याचे अशोक सपाटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.