तुळजापूर (प्रतिनिधी)-   तिर्थक्षेञ तुळजापूरात  शिवजयंती कालावधीत मोठ्या प्रमाणात चोरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे व चोरटे सापडत नसल्याने आता तिर्थक्षेञ तुळजापूर सुरक्षा बाबतीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंञी प्रताप सरनाईक यांनी जातीने लक्ष घालुन तिर्थक्षेञ तुळजापूरात होणाऱ्या चोरी घटनांचा बंदोबस्त करण्याची  मागणी शहारवासीयांसह भाविकांमधुन केली जात आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील धाराशिव रोडवरील सारागौरव शेजारी असणाऱ्या सागर  नगर मधील  ऐका घरात अज्ञात चोरांनी घरात प्रवेश  करुन  घरातील मंडळीना शस्ञाचा धाक दाखवुन कपाटातील सोने व रोख रक्कम सात हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 02.75वा सुमारीस घडली. तर राञी शुक्रवार पेठ भागातील अण्णासाहेब रोचकरीचा घरात चोरटे घुसुन घरात स्वयंपाक करीत असलेल्या महिलेचा डोळ्यात चटणी टाकुन चोरी करण्याचा प्रयत्न चक्क राञी 7.45 वाजता केला. सदरील घटना वर्दळ व शहराचा भागात घडली.

या चोरीच्या घटनेने शहरातील महिलांन मध्ये असुरक्षितेचे वातावरण  निर्माण झाले  आहे. या घटनांमुळे तिर्थक्षेञ तुळजापूरात भितीचे व चिंतेचे असुरक्षितेचे  वातावरण पसरले असुन चोरीचा घटना थांबण्याचे नावे घेईनासे झाले आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी कि, धाराशिव रस्त्यावर असणाऱ्या सारागौरव शेजारी असणाऱ्या सागर नगर मध्ये ओंकार अनिल लसणे यांच्या घरात समोरुन तोंडाला बांधुन  पाच जण शस्ञासह घरात घुसले. ओंकार लसणेच्या आईचा गळ्यावर चाकु ठेवला असता त्याचा मुलगा तिथे येताच त्याने भितीने चाव्या घ्या. कपाटातील काय घ्यायचे ते घ्या म्हणत त्यांच्याकडे चाव्या दिल्या. असता कपाटातील  सोने दागिने व रोख सात ते आठ हजार रुपये घेऊन लंपास केल्याचे समजते. सदरील चोरटे हे स्पष्ट असे मराठी बोलत होते. त्यांच्याकडे चाकु सह अन्य हत्यार असल्याचे ओंकार लसणे यांनी सांगितले.

तसेच सोमवारी राञी अण्णासाहेब रोचकरी यांच्या घरातील महिलांचा डोळ्यांत चटणी टाकुन घर लुटण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. तसेच सप्ताळ नगर भागात चोऱ्यांचा प्रयत्न झाल्याचे कळते.

 
Top